कंडक्टर महिलेत जुम्पली 

एसटी वाहकला मारहाण 

लातूर जिल्ह्यात रेणापूरमधील घटना

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यातील महिलांना हाफ एसटी तिकीट देण्याची घोषणा शिंदे- फडणवीस सरकारने जागतिक महिला दिनी केली असली तरी या घोषनेचा शासन आदेश (GR) अद्याप न काढल्याने एसटी वाहक तसेच महिलांमध्ये खटके उडू लागले आहेत. मंगळवारी तर एका एसटी वाहकला मार खावा लागला. महिलांना हाफ तिकिटीचा सरकारी आदेश अद्याप आला नसल्याने फुल तिकीट घ्यावं लागणार असं वाहकच म्हणणं होत. तर सरकारने महिलांना हाफ तिकीट घोषणा करून आठवडा उलटला असं महिलांचे म्हणणं आहे. मात्र सरकारच्या अशा घोषणाचा सरकारी आदेश निघेपर्यंत असे खटके उडून एसटी वाहक मार खाणार कां असा सवाल उपस्थित होत आहे.

या घटनेत लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे एक महिला एसटी प्रवास करत होती. त्यावेळी तिने वाहकाकडे हाफ तिकिटीची मागणी केली. मात्र एसटी वाहक आम्हाला अद्याप तसें आदेश नसल्याचे सांगत फुल तिकीट घेण्यास सांगितले. मात्र महिले सोबत असलेल्या व्यक्तीने सदर वाहकास मारहान केली. कारण शासनाने घोषीत केल्याप्रमाणे त्या महिलेस तिकीटामधे 50% सवलत दिली नाही. 

दरम्यान, जनतेला हे माहीत नाही की, शासन जोपर्यंत जी.आर. काढत नाही तोपर्यंत ती सवलत लागू होत नसते. त्यामुळे ती सवलत देताही येत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50% तिकीट दरामधे सवलत तर जाहीर केली. परंतू तसा जी.आर न काढल्यामुळे, एसटीमधून प्रवास करणार्‍या ग्रामीण भागातील महिला प्रवाशांकडून कंडक्टरांवर अशा पद्धतीने त्यांच्या नातेवाईकांकडून मारहान केली जात असल्याच्या घटना घडत असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सर चिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले. त्यामुळे शासनाची ही घोषणा जी.आर न काढल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांना ग्रामीण भागांमधे ड्यूटी करणे जिकीरीचे झाले असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे असे ही बरगे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here