राज्यात २७०१ नवीन रुग्ण
@maharashtracity
मुंबई: राज्यात बुधवारी २४ तासात २,७०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. हि चौथी लाट आहे का अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patient) एकूण संख्या ७८,९८,८१५ झाली आहे.
आज १३२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४१,१४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ९,८०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात बुधवारी एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,११,५४,९७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,९८,८१५ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत १७६५ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १,७६५ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण १०,७२,६१९ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९५६९ एवढी झाली आहे.