भूमिपुत्र अभिजीत पाटील ‘मेड इन इंडिया आयकॉन 2021″ चे मानकरी
@Parivatan2020
By Pratik Yadav
पनवेल :पर्यावरणासाठी केलेल्या कामाची दखल घेत पनवेलचे सुपुत्र अभिजित पाटील यांचा ‘मेड इन इंडिया आयकॉन 2021’ (Made in India Icon) पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते राजभवन (Raj Bhavan) येथे एका कार्यक्रमात अभिजित पाटील यांना गौरविण्यात आले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांच्यासह गायक उदित नारायण, कुमार सानू, मराठी कलाकार स्वप्निल जोशी, भरत जाधव, प्रशांत दामले, उद्योगपती सौ लोढा, पोलिस अधिकारी यांनाही सन्मानित करण्यात आले.
श्री पाटील गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात वावरत आहेत. उद्योग क्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी घेतली. रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर त्यांची नुकतीच सदस्यपदी नेमणूक करण्यात आली.
“मला भरभरून यशाची नेहमी भीती वाटायची. त्यानं माणसं तुटतात, आपण एकटे पडतो असं वाटायचं. आपल्याला नकोच ते यशबिश! पण पुरस्कार मिळाल्यापासून भीती कमी होते आहे. यश इतकं काही धोक्याचं नसतं तर.. त्याला इतकं घाबरायचं कारण नाही.. त्याच्याकडे नीट बघतो आहे .
शांतपणे. संपूर्णपणे. त्याला नि:संग स्वीकारतोय. बरेच पुरस्कार मिळाले मिळत आहेत पण यामुळे डोक्यात अजिबात हवा जाणार नाही याची शास्वती देतो. स्वतः ला अर्थवटच्या भूमिकेत पाहतो कारण परिपूर्ण होऊन संपण्याची माझी इच्छाशक्ती नाही. आणि इथेच थांबणार नाही. यशाचे शिखर गाठायचे आहे.” – अभिजित पाटील