सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

Twitter : @maharashtracity

मुंबई: राज्यात कॉस्मेटिक अँड ड्रग्स कायद्यान्वये डी फाम आणि बीफाम केलेल्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाकडून फार्मसी चालवली जाते. यांच्या उपस्थितीतच औषधें विक्री केली जाते. मात्र ऑनलाईन पद्धतीने देखील राज्यात औषध विक्री डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय होत असून अशा विक्रीने रुग्णांचे जीव गेले आहेत. यावर सरकारची भूमिका काय, असा सवाल सदस्य अभिजित वंजारी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमधून उपस्थित केला. यावर उत्तर देताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सचिवांकडून संबंधित नियम तपासून गैर घडत असल्यास कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.

अभिजित वंजारी यांनी ऑनलाईन औषध विक्री डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय होत असल्याचे सांगत टाटा एमजी, फ्लिपकार्ट, ऍमेझॉन सारखे अनेक पोर्टल ऑनलाईन औषध विक्री करत असल्याचे सांगितले. हे पोर्टल डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय औषध विक्री करतात. यामुळे अशा विक्री केलेल्या औषधांच्या ओव्हर डोसमुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हे गंभीर असून एमटीपी किट, नैराश्य प्रतिबंधक औषधे सारखी औषधें डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय विक्री करतात. तसेच अपोलो फार्मसीच्या रिटेल आउटलेट मधून अशी औषधे विकली जात आहेत. अशाना कॉस्मेटिक अँड ड्रग कायदा लागू नाहीत का ? ऑनलाईन विक्रीला शासन बंद करणार का ? यावर सरकार काय बंदोबस्त करणार असा सवाल उपस्थित केला.

यावर बोलताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर देताना सांगितले कि, या तक्रारींचे निवेदन लिहून दिल्यास संबंधित सचिवांकडून संबंधित नियम तपासले जातील. तसेच केंद्राने ऑनलाईन औषध विक्रीसाठी वेगळी काही नियम केलेत का याची माहिती घेऊन चुकीचे घडत असल्यास सरकार त्यावर कारवाई करेल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here