@maharashtracity

पहिल्या सत्रात १८,३२४ नागरिकांची ऑफलाईन पडताळणी

मुंबई: दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे. (Local journey allowed) या पार्श्वभूमीवर मुंबईतील ५३ रेल्वेस्थानकांवर बुधवारपासून लसीकरण पडताळणी करून मासिक पास देण्यास सुरुवात झाली. पहिल्या सत्रात १८,३२४ नागरिकांची पडताळणी करण्यात आली असून यातील १७,७५८ प्रवाशांना मासिक पास देण्यात आला आहे. मात्र हे प्रवासी १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करू शकतात.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या (corona patients) कमी झाल्याने टप्प्या- टप्प्याने निर्बंधांत शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार ज्यांनी कोरोना प्रतिबंधक दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवासास मुभा देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केल्य़ानंतर त्याबाबतच्या अंमलबजावणीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे.

यासाठी मुंबई महानगरपालि‍का (BMC) क्षेत्रातील ५३ रेल्‍वे स्‍थानकांवर ३५८ मदत कक्ष सुरु करण्‍यात आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) तसेच अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी रेल्वे स्थानकांवर भेटी देऊन या प्रक्रियेची पाहणी केली.

दुपारी ३ वाजेपर्यंत १८ हजाराहून अधिक नागरिकांची पडताळणी पूर्ण झाली. तर दुपारपर्यंतच्या पहिल्या सत्रात रेल्वेने १७ हजार ७५८ मासिक पासांचे वितरण केले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here