@maharashtracity

मुंबईत ३५ लाख मुले लस लाभार्थी

मुंबई: २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी मिळाल्याने ३५ लाख मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Children of the age between 2 to 18 would be vaccinated soon)

सध्या पालिका लसीकरणासाठी सज्ज असून दिवाळीपासून लसीकरण सुरू करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तर तत्पूर्वी लसीकरणाची नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सुरुवातीला १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार असून उर्वरित वयोगटातील लसीकरण नंतर होणार आहे. कोवॅक्सिन लस (covaxin) सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका आठवड्यात मान्यता देणे अपेक्षित असल्याचे मासिना हाॅस्पिटल संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डाॅ तृप्ती गिलाडा यांनी सांगितले.

आपण कोविड 19 विरूद्ध लढाईच्या शेवटच्या टप्प्यात असून मुलांचे लसीकरण झाल्यास शाळा उघडण्यास मदत होईल. आता आपल्याला फक्त लस उत्पादन वाढवण्याची गरज आहे. लहान मुलांच्या लसीकरणाकडे संशयाने न पाहता लसीकरण पूर्ण करणे महत्वाचे आहे. यातूनच हि मोहीम पूर्णत्वाकडे जाऊ शकेल, असा विश्वास ही गिलाडा यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here