@maharashtracity

मुंबई: राज्यात मंगळवारी ३५८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,२८,२५८ झाली आहे. काल ३७० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७७,०९६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २७८८ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. राज्यात मंगळवारी २ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५०,९४,०५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२८,२५८ (०९.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १२८ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १२८ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण ११५१७८२ रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९७३८ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here