@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी २०५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,७८,८०१ झाली आहे. काल १५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२९,७९५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ११६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०३,२५,४१४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७८,८०१ (०९.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ११७ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ११७ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण १०,५९,५१२ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५६३ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here