@maharashtracity

मुंबई: राज्यात गुरुवारी २८१३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७९,०१,६२८ झाली आहे. आज १०४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४२,१९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ११५७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात गुरुवारी एक कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,११,९६,७२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,०१,६२८ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १७०२ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १७०२ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण १०,७४,३२१ रुग्ण आढळले. तसेच १ रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५७० एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here