@maharashtracity
मुंबई: राज्यात मंगळवारी ३८४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ८१,२५,३६९ झाली आहे. आज ४२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७४,६२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१४ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण २३८७ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. राज्यात मंगळवारी चार कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४९,७६,५४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२५,३६९ (०९.५६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत १२९ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १२९ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,५०,६६० रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७३६ एवढी झाली आहे.