@maharashtracity

धुळे: गुगल अँपवर (Google App) ऑनलाईन वाईन शॉपचा नंबर शोधून त्यावरुन वाईनच्या (wine) दोन बाटल्यांची ऑर्डर करणे देवपूरातील एका शिक्षकाला चांगलेच भोवले. मोबाईल नंबरचा वापर करुन अज्ञात व्यक्तीने या शिक्षकाच्या बँक खात्यातून ९९ हजाराची रक्कम परस्पर काढून घेत चुना लावला.

याप्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात पराग सुभाष धात्रक (वय ३९) रा.केयुर अपार्टमेंट, प्रमोदनगर, देवपूर धुळे या शिक्षकाने फिर्याद दिली आहे. दि. २४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ९ ते पावणे दहाच्या दरम्यान पराग धात्रक यांनी त्यांच्या मोबाईल फोनवरुन पुनम वाईन शॉप या दुकानाचा गुगल अँपवर ऑनलाईन क्रमांक शोधला. त्या क्रमांकावर फोन करुन २ वाईन बॉटलची ऑर्डर दिली. त्यानंतर काही वेळाने पराग धात्रक यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ४५७ रुपये अनोळखी इसमाने परस्पर तांत्रिक पध्दतीचा वापर करुन काढून घेत फसवणुक केली आहे.

ही फसवणूक वाईन ऑर्डरसाठी ज्या नंबरवर कॉल केला होता, त्याच मोबाईलधारकाने केल्याचा संशय असून त्यानुसार त्या मोबाईल क्रमांक धारकाच्याविरुध्द पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here