@maharashtracity

मुंबईत वर्षातील १७ वे अवयवदान

मुंबई: सध्या कोरोना संसर्गामुळे अवयवदान चळवळ धीमी झाली असली तरी अशा ही स्थितीत अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. मुंबईत एका ८४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान झाल्याने या चळवळीला अधिक प्रेरणा मिळाली आहे.

ही व्यक्ती आजतागायत झालेल्या अवयव दानात सर्वाधीक वयाची व्यक्ती मानली जात आहे. यांचे मूत्रपिंड आणि यकृत दान करण्यात आले.

मुंबई विभागीय अवयवदान आणी प्रत्यारोपण समन्वय समितीकडून सांगितल्या प्रमाणे हे अवयवदान २१ जुलै रोजी करण्यात आले. परेल येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये या ज्येष्ठ नागरिकाला दाखल करण्यात आले होते. यांच्या मृत्यू पश्चात अवयवदान करण्याची इच्छा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यामुळे हे या वर्षातील शहरातील १७ वे अवयवदान ठरले.

या अवयवदानाने दोघांचे आयुष्य वाचले. यावर बोलताना मुंबई विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समन्वय समितीचे डॉ. एस के माथुर यांनी सांगितले की, दुसरी लाट सुरु होण्याआधी अवयवदान संख्या वाढत होती. मात्र एप्रिल महिन्यात पुन्हा रुग्णात वाढ झाली. आता रूग्ण संख्या घटत असून पुन्हा अवयवदान चळवळीला उभारी येऊ शकते अशी आशा डॉ. माथुर यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here