धर्माचे राजकारण करणाऱ्यांना माजी आमदार प्रा शरद पाटील यांचा इशारा

@maharashtracity

धुळे: शेतकऱ्यांचा ऊस तोडला जात नाहीये, साखर कारखाने (sugar mills) बंद आहेत, ऊस तोडणीसाठी मजूर मिळत नाही. एकीकडे ही परिस्थिती असताना काही ऊस कारखाने डिस्टीलरी (distillery) चालवून नफा कमवत आहेत, सरकारकडून अनुदान (grant) लाटत आहे. तर विरोधी पक्ष धर्माचे राजकारण (politics of religion) खेळण्यात दंग आहे. या बिकट परिस्थीतीत आठ एकर शेतातील उभा ऊस जाळून खाक झाल्याने उद्विग्न झालेले धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा शरद पाटील (Former MLA Prof Sharad Patil) यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मी सत्ताधारी पक्षात असलो तरी मला लाज वाटते. सरकार आमच्या शेतातील ऊस गाळप करण्याची व्यवस्था करू शकत नाही. धुळे ते चोपडा परिसरात असंख्य ऊस कारखाने बंद आहेत. नेते सरकारी अनुदान मिळवून कारखाने आणि डिस्टीलरी चालवून नफेखोरी करत आहेत. तर माझ्यासारखा सामान्य शेतकरी, ज्याच्या चार पिढ्या शेतीवर अवलंबून आहे, तो उध्वस्त होत आहे, अशी खंत प्रा पाटील यांनी व्यक्त केली.

शेतकरी प्रश्नाकडे लक्ष देण्यास ना सरकारला वेळ आहे, आणि ना ही विरोधी पक्षाला, अशी खंत व्यक्त करून काँग्रेस पदाधिकारी (Congress Leader) प्रा शरद पाटील म्हणाले, विरोधी पक्षाने धार्मिक उन्माद थांबवावा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. अन्यथा एक दिवस हेच शेतकरी तुम्हाला गोळ्या घालतील.

सन २००९ ते २०१४ या कालावधीत शिवसेना (Shiv Sena) आमदार असलेले प्रा पाटील यांनी तिकीट नाकारण्यात आल्याने सेनेला जय महाराष्ट्र केले होते. मागच्या वर्षी ते काँगेस पक्षात दाखल झाले.

धुळे (Dhule) शहरालगत असलेल्या शेतात प्रा पाटील यांनी ऊस लावला होता. सुमारे साडेतीनशे क्विंटल उसाचे उत्पादन झाले होते. ऊस कापणीसाठी आला होता, मात्र, जवळपासचे सगळे साखर कारखाने बंद पडल्याने ऊस कोणाला द्यावा हा प्रश्न प्रा पाटील यांच्यासह या परिसरातील सगळ्याच शेतकऱ्यांपुढे होता.

तशातच रखरखत्या उन्हामुळे शेतातील उसाला आग लागली आणि आठ एकरातील सगळा ऊस जळाला. यामुळे उद्विग्न झालेल्या प्रा पाटील यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here