@maharashtracity
पनेवल: खारघर मधील सेक्टर पंधरा येथील खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात निवासी वैद्यकिय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एका बोगस डॉक्टरविरुद्ध पनवेल महानगरपालिका आणि पोलिस दलाच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या परवानगीने मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील डॉ. भक्तराज भोईटे, डॉ.सुरेश पंडित, विजय महाले, स्टाफ नर्स संगीता पाटील, विकास तीरगुळ यांच्या मदतीने सापळा रचून बोगस डॉक्टरला पकडण्यात आले.
खारघर पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्त स्टींग ऑपरेशन करून बोगस डॉक्टरवर कारवाई केली.
या डॉक्टरकडे वैद्यकिय व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचे सिध्द झाल्याने खारघर पोलिस स्थानकांत या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.