@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात, मुख्य कार्यालयात, पालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात, रस्ते विभागात आदी ठिकाणी खासगीकरणाचे वारे वाहत आहेत. या सर्व विभागात पालिकेने स्वच्छतेसाठी, सुरक्षिततेसाठी खासगी यंत्रणा भाडेतत्वावर घेतली आहे. आता अग्निशमन दलातही स्वच्छतेसाठी अशाच प्रकारच्या यंत्रणा वापरण्यात येणार आहे. यासाठी पालिका ९३ लाख रुपये खर्च करणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्ष व भाजप यांच्याकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई अग्निशमन दल हे २४ तास कार्यान्वित असते. अग्निशमन दलाची ३४ अग्निशमन केंद्रे आहेत. तर ६ प्रादेशिक समादेश केंद्रे आहेत. अग्निशमन दलाचा संपूर्ण कारभार हा प्रादेशिक समादेश केंद्रे व मुख्य केंद्र (प्रमुख अग्निशमन अधिकारी यांचे कार्यालय) यांद्वारे पार पाडला जातो. यामध्ये, प्रादेशिक समादेश केंद्राचा महत्वपूर्ण भाग असतो.

या समादेश केंद्रांमध्ये संबंधित उप प्रमुख अग्निशमन अधिकारी यांचे प्रशासकीय, ऑपरेशनला कार्यालय, त्यांचे कर्मचारी व अधिकारी तसेच प्रशिक्षण विभाग आणि त्याकरिता आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग आहे.

या प्रादेशिक समादेश केंद्राच्या आवारातील परिसर, स्टेशन कार्यालय, नियंत्रण कक्ष, अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने यांची सफाई करण्यासाठी कर्मचारी वर्ग नेमलेला आहे. परंतु या अतिरिक्त इमारतींकरिता सफाई कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. त्यामुळे सफाई कामासाठी पालिका अग्निशमन दलातर्फे भायखळा, वडाळा, विक्रोळी व बोरिवली येथील समादेश केंद्राच्या इमारतींमध्ये दैनंदिन साफसफाई व स्वच्छता राखण्यासाठी २ वर्षांकरिता मे.एस.पोळ एंटरप्रायजेस या खासगी कंत्राटदाराची यंत्रणा ठेवण्यात नेमण्यात येणार आहे. त्यासाठी कंत्राटदाराला ९३ लाख ४८ हजार रुपये मोजण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here