@maharashtracity

मुंबई: मुंबईसह राज्यातील परिचारिकांनी सोमवारपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन (protest by nurses) सुरु केले आहे. मंगळवारी या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या. मात्र यंत्रणेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारीदेखील हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे यांनी सांगितले.

जेजे रुग्णालयातील (JJ Hospital) परिचारिकांच्या आंदोलनाविषयी आधी दोन बैठका झाल्या असल्याचे जेजे रुग्णालय समुहाच्या डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थी परिचारिका या काळात कार्यरत राहणार असून ज्या परिचारिका आंदोलनात सहभागी नाहीत, अशा परिचारिका आयसीयू (ICU), आपत्कालीन विभागात कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले.

यासह आयएमई (IME)आणि बीएसईच्या (BSE) विद्यार्थी परिचारिका मिळून काम करणार आहेत. दोन दिवसांच्या आंदोलनासाठी ही तयारी जेजे अंतर्गत करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. तसेच जेजे संबंधित काही परिचारिकांच्या मागण्या असतील तर त्या बैठक घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर त्यांनी पूर्णपणे कामबंद करण्याचा निर्णय घेतला तर त्यासाठी काय उपाययोजना करायच्या यासाठीही वैद्यकीय अधिक्षक आणि मेट्रेन्ससोबत चर्चा करु असेही डॉ. सापळे यांनी सांगितले.

हे आंदोलन खासगीकरणाविरोधात (protest against privatisation) असल्याचे सांगण्यात आले. आगामी दोन दिवस हे आंदोलन सुरु राहणार आहे. राज्य सरकारच्या जेजे रुग्णालयासह सेंट जॉर्ज, जीटी आणि कामा रुग्णालयातील परिचारिका या आंदोलनात आहेत.

दरम्यान, कंत्राटी पदे भरण्यास मान्यता दिली असून याचा विरोध परिचारिकांकडून केला जात आहे. परिचारिकांना या निर्णयातून वगळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सरकारला केली आहे. यासाठी शासनाने चर्चेसाठी वेळ द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here