@maharashtracity

मुंबई: सध्या मुंबईत कोरोनाचा मुक्काम आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसरी लाट कोणत्याही क्षणी मुंबईत येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळेच मुंबईतील शाळा, कॉलेज, क्लास बंद आहेत.

विद्यार्थ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही. कोरोनावर अद्याप ठोस औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे पालकही आपल्या पाल्यांना क्लास व शाळेत पाठविण्यास उत्सुक नाहीत. असे असताना मुंबई महापालिका ८२ लाख रुपये खर्चून ११ सीबीएससी (४ हजार विद्यार्थी) १ आयसीएसई बोर्डाच्या (२७५ विद्यार्थी) नर्सरी, ज्यूनिअर केजी, सीनिअर केजी, इयत्ता १ ली ते ७ वी च्या एकूण ४ हजार २७५ विद्यार्थ्यांसाठी मे. मनोहर पुस्तक भांडार या पुरवठादाराकडून पाठयपुस्तकांची खरेदी करणार आहे. तसेच, पुरवठादाराने ह्या पाठयपुस्तकांचा पुरवठा कार्यदेश मिळाल्यानंतर पुढील २ महिन्यात करायचा आहे.

मात्र पालिकेने, सन २०२१ – २२ या वर्षात सीबीएससी -१०, आयसीएसई बोर्डाच्या १ अशा ११ शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश देण्यात आले आहेत, असे कारण देत सदर विद्यार्थ्यांसाठी पाठयपुस्तकांची खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.

त्यामुळे या प्रस्तावाला भाजप व विरोधी पक्षाकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here