@maharashtracity

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अचानक दडी मारून बसलेल्या पावसाच्या सरी गुरुवारी सकाळपासून पुन्हा एकदा बरसल्या. त्यामुळे गरमीने हैराण झालेले मुंबईकर काहीसे सुखावले.

गेल्या काही दिवसांपासून पाऊस गडप झाल्याने मुंबईकरांनी आपल्या छत्र्या म्यान करून ठेवल्या होत्या. तसेच, पाऊस पडत नसल्याने मुंबईकरांना गरमीचा सामना करावा लागत होता. मात्र गुरुवारी सकाळपासूनच पावसाने बरसात केल्याने मुंबईकरांनी म्यान केलेल्या छत्र्या पुन्हा एकदा बाहेर काढल्या आणि आपले कामाचे ठिकाण गाठले.

गुरुवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या कालावधीत शहर भागात २६.४५ मिमी तर पूर्व उपनगर भागात २५.७२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र पश्चिम उपनगरात केवळ ६.७४ मिमी इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाने शहर आणि पूर्व उपनगरातच चांगली बरसात केली आहे. तर पश्चिम उपनगर भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडल्याचे दिसून येते.

पूर्व उपनगरातील पवई, तुळशी व विहार या तीन तलावांतही पावसाच्या सरी काही प्रमाणात बरसल्या. त्यामुळे या तलावातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here