नाटो संस्था संचालक डॉ. कृष्णन यांची माहिती

Twitter: @maharashtracity

मुंबई: सध्या अवयवदान चळवळ जोमात असून अवयवदान करणाऱ्या दात्यांची तसेच अवयव प्रत्यारोपित होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, अवयवांची गरज असलेल्या रुग्णांकडून अवयवाच्या वाहतुकीचा संपूर्ण खर्च घेण्यात येतो. हा खर्च श्रीमंत रुग्णांना परवडतो. मात्र, गरीब रुग्णांना परवडत नाही. म्हणून गरीब रुग्णासाठी अवयव प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी नोटोकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती नाटो संस्थेचे संचालक डॉ. कृष्णन यांनी दिली.

अवयव प्रत्यारोपण होणाऱ्या रुग्णांचे पुनर्वसन करणे आणि त्यासाठी येणाऱ्या औषधांवरील खर्च कमी व्हावा यावर केंद्रासोबत चर्चा सुरू आहे. रुग्णांना औषधांसाठी दरमहा किमान १० हजार रुपये मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही रक्कम मिळाल्यास रुग्णांवर येणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार असल्याचेही नाटो संस्था संचालक डॉ. कृष्णन यांनी सांगितले.

दरम्यान, गुरुवारी केईएम रुग्णालयात उत्तीपेशी पेढी सुरु करण्यात आली. रुग्णांची त्वचा भाजली असल्यास अशा रुग्णांना या पेढीमुळे दिलासा मिळणार आहे. मात्र या विभागामध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच त्यांची देखभाल करण्यासाठी आणि मेंदमृत होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानासाठी तयार करणे यासाठी केईएम रुग्णालयामध्ये तीन सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेकडून मान्यता देण्यात आली असून, लवकरच त्यांची नियुक्ती होणार आहे. हे सल्लागार रुग्णांचे रक्तदाब, त्यांच्या हृदयाचे ठोके, त्यांची प्रकृतीची तपासणी करणे आदी जबाबदारी त्यांच्यावर असणार असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here