मध्यवर्ती मार्डकडून मागणीला पाठींबा नाही

@maharashtracity

मुंबई: कोविड सेवा करुन निवासी डॉक्टर (Resident Doctors) परिक्षा देण्याच्या मानसिक स्थितीत नाहीत. तसेच प्राध्यापकांचा संप (Strike of medical teachers) झाल्याने वैद्यकीय पदव्युत्तर परिक्षा एका महिन्याने पुढे ढकलावी, अशी मागणी मार्ड (MARD) या निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून करण्यात येत आहे.

याबाबत मध्यवर्ती मार्डकडे विचारले असता अशा कोणत्याही मागणीला मध्यवर्ती मार्डचा पाठींबा नसून परिक्षा वेळेत घ्याव्यात अशी मागणी करत असल्याचे प्रतिनिधींने सांगितले.

दरम्यान, यवतमाळ जिल्हा रुग्णालय (Yavatmal civil hospital) मार्ड संघटनेकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री व कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक यांना परिक्षा पुढे ढकलण्याबाबत पत्र पाठविण्यात आले. या पत्रात गेले दोन वर्षे निवासी डॉक्टरांनी कोविड रुग्ण सेवा (COVID patients) केली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये तणाव (stress) आहे. सुमारे एक तृतीयांश डॉक्टर कोविड आणि नियमितच्या रुग्णसेवेत व्यस्त होते. त्याच सोबत प्राध्यापकांचा संप झाल्याने अध्ययनात खोळंबा झाला.

आरोग्य विद्यापीठाकडून (Maharashtra Health University) परिक्षेच्या तयारीसाठी ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला. मात्र, बहुतांश डॉक्टरांना कामापासून सुटका झाली नव्हती. शिवाय नीट २०२२ (NEET-2022) परिक्षांच्या नोटिस मिळाली नसल्याने परिक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. हा एक महिन्याचा कालावधी परिक्षेचा अभ्यास करण्यास सहाय्यक ठरेल असे पत्रात त्यांनी नमूद केले आहे.

मध्यवर्ती मार्डची भूमिका

दरम्यान, परिक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत मध्यवर्ती मार्ड संघटनेला विचारले असता अशा कोणत्याही मागणीला मध्यवर्ती मार्ड संघटनेचा पाठींबा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पदव्युत्तर परिक्षा (exam of post graduate course) वेळेत व्हावी, अशी मागणी मध्यवर्ती मार्ड करण्यात आली असल्याचे प्रतिनिधीने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here