@maharashtracity

धुळे: टोकियो ऑलिंम्पिकमध्ये (Tokyo Olympic) सहभागी होणार्‍या महाराष्ट्रातील (Maharashtra) १० क्रीडापटूंना प्रोत्साहीत करण्यासाठी, त्यांनी देशासाठी सुवर्ण कामगिरी करावी, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आज धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने धुळ्यात अनोखी सेल्फी रॅली (Selfie Rally) काढण्यात आली.

धुळे (Dhule) शहरातील प्रमुख चौकांमध्ये ऑलिंम्पिक स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळांडूच्या छायाचित्र व फलकांसह वाहन रॅली काढण्यात आली. आग्रारोड छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय येथे ऑलिंम्पिक बोध चिन्हांच्या फलकांचा सेल्फी पॉईट उभारुन तेथे सर्व सामान्य नागरीकांनी खेळांडूना प्रोत्साहन म्हणून सेल्फी काढून प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

नागरीक, तरुण, तरुणींनी आपल्या भ्रमणध्वनींवर छायाचित्रे घेवून ती छायाचित्रे सोशल मिडीयावर टाकून खेळांडूना चिअर्स केले.
यावेळी धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्यासह अनेक मान्यवरांनी देखील खेळांडूना शुभेच्छा देत प्रोत्साहन देणारी सेल्फी घेतली.

हा उपक्रम धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी नारायण धनदर, गुरुदत्त चव्हाण, योगेश देवरे, ज्ञानेश्‍वर जाधव, राहुल देवरे यांनी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here