By संतोष मासोळे

@SantoshMasole

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर शहरात मध्यरात्री दुकानाला अचानक आग लागल्याने संपूर्ण दुकानच जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने दुकानाजवळच असलेल्या वीज वाहक डिपीजवळ आग पोहचली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या आगीत दुकानाचे 15 ते 16 लाखांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार रविवारी मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास पातळेश्वर मंदीराजवळील पाताळेश्वर कॉम्प्लेक्समधील जयेश सेल्स अँड सर्विसेस या दुकानाला भीषण आग लागली. यात दुकानातील गॅस ग्रीझर, मिक्सर, शेगड्या, लहान चक्की, कुलर, बजाज कंपनीचे इलेक्ट्रॉनीक वस्तू आदी साहीत्य जळून खाक झाले. आगीत अंदाजे १५ ते १६ लाखांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here