@maharashtracity
धुळे: ठाणे महानगर पालिका (Thane Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक यांच्यावर फेरीवाल्याकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी धुळे महानगर पालिका (Dhule Municipal Corporation) अधिकारी व कर्मचार्यांनी मंगळवारी मनपाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन काळया फिती लावून आंदोलन केले.
याबाबत मनपा अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने आयुक्त अजीज शेख यांना निवेदन देण्यात आले. तर मनपा अधिकार्यांनी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर त्वरित कार्यवाही करण्यात, यावी अशी मागणी केली.
या आंदोलनात अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शिल्पा नाईक, तुषार नेरकर, पल्लवी शिरसाठ, अभियंता कैलाश शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ.महेश मोरे, सहायक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, नगर सचिव मनोज वाघ, बळवंत रणाळकर, किशोर सुडके, रमजान अन्सारी, प्रसाद जाधव, सुनील देवरे व सर्व स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहायक आयुक्त श्रीमती पिंपळेंवर झालेल्या हल्याचा सर्वच स्तरातून निषेध झाला. या हल्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर आंदोलन झाले. त्याचाच भाग म्हणून धुळे महानगर पालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांनीही सोमवारी काळ्या फिती लावून आणि दोन तास लेखणीबंद आंदोलन करुन या गुन्हेगारी कृत्याचा निषेध केला.