@maharashtracity
मुंबई: राज्यासह मुंबईत मंगळवारी कोरोना रुग्ण वाढ झालेली दिसून आली. मंगळवारी राज्यात ५५० तर मुंबईत १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी हीच नोंद राज्यात २९२ तर मुंबईत ६६ एवढी होती. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ८१,१६,३८४ झाली आहे.
काल ७७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७९,६३,८५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,२१६ सक्रिय रुग्ण आहेत.
तसेच राज्यात मंगळवारी २ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४५,६९,१७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,१६,३८४ (०९.६० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत १२० बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १२० एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण ११,४८,३१३ रुग्ण आढळले. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील (Mumbai) एकूण मृत्यूची संख्या १९७२६ एवढी झाली आहे.