@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेला (BMC) लसीकरणासाठी १ लाख ६० हजार २४० कोविड प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शनिवारी शहर व उपनगरे परिसरातील लसीकरण केंद्रांवर (vaccination centres) लसीकरण सुरू राहणार आहे.

यासंदर्भातील माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत सध्या लसीचा तुटवडा असल्याने मध्यंतरी काही वेळा लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे लसीचा पहिला व दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांना, तरुणांना, महिलांना लसीचा डोस मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

मात्र आता मुंबईकरांसाठी १ लाख ६० हजार २४० कोविड प्रतिबंधक लसींचा साठा काल गुरुवारी रात्री महापालिकेला प्राप्त झाला आहे.
या लसींच्या साठ्याचे वितरण शुक्रवारी सर्व शासकीय व महापालिका केंद्रांना करण्यात आले आहे. त्यामुळे आता शनिवारी सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे.

मुंबई महापालिकेला प्राप्त लस साठ्यामध्ये कोविशिल्डचे (covishield) १ लाख ५० हजार तर कोवॅक्सिनचे (covaxin) १० हजार २४० डोस समाविष्ट आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here