By Sadanand Khopkar
Twitter : @nalawadeanant
मुंबई: नगर जिल्हा, तालुका पाथर्डी टाकळी- मानुर येथे १० वी परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याची घटना अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटाळे होईल, असा संताप व्यक्त करीत सरकारने या विरोधात कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
अजित पवार म्हणाले, वरील घटना बुधवारी दुपारी टाकळी-मानुरी येथे इयत्ता १० वीचा भूमितीचा पेपर चालू होता. त्या वेळी परीक्षार्थीना कॉपी पुरवणार्या जमावाने परीक्षा केंद्रात बळजबरी प्रवेश करत भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना धमकावून कॉपी पुरवण्यास मुभा देण्याची मागणी केली. अधिकार्यांनी याला नकार दिला तेंव्हा जमावाने दगडफेक सुरू केली. याशिवाय जालना येथील परीक्षेच्या वेळी जिल्हा परीषद शाळा, सेवली या केंद्रावर ‘आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या, अन्यथा तुम्हाला जिवे मारू’, अशा धमक्याच केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांना देण्यात आली. असे प्रकार घडल्यास अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होईल असा इशाराही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी दिला.