खासदार गजानन कीर्तिकर यांच्या निधीतून कामाला सुरुवात
Twitter : @maharashtracity
मुंबई: अंधेरी पूर्व सुभाष नगर येथील रहिवाशांच्या शिकणाऱ्या मुली व मुलांना राहत्या परिसरात अभ्यासासाठी शांत वातावरण नव्हते. घर छोटे आणि घरच्या घरी बसून अभ्यास करणे अतिशय कठीण झाले होते. ही अडचण लक्षात घेऊन समाजसेवक भिमेश मुतुला आणि संजयकुमार कलकोरी यांनी ग्रंथालयाची संकल्पना मांडली. उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या कानावर ही बाब सांगून पाठपुरावा केला.
विद्यार्थ्यांना हक्काचे अभ्यास करण्याचे स्थान धर्मासोनू वेल्फेअर सोसायटीच्या शेड जागेवर हे ग्रंथालय उभारण्यात आले. हे कार्य खा. कीर्तिकर यांच्या खासदार निधीतून होत आहे. या कामात भाजपचे नेते मुरजी पटेल यांचे सहकार्य लाभले. या स्थळाचे भूमिपूजन खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते झाला. तसेच मुख्य अतिथी भाजप नेते मुरजीभाई पटेल, माजी नगरसेवक सुरेंद्र दुबे, विशेष उपस्थिती भिमेश मुतुला, संजीव कलकोरी, प्रशांत पात्रे, जगदीश सिंह आदि मान्यवर उपस्थित होते.