@maharashtracity

जागतिक सुर्य नमस्कार दिनी 240 विद्यार्थ्यांचा सहभाग

धुळे: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 75 कोटी सूर्यनमस्कार (Surya Namaskar) पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने जागतिक सूर्नमस्कार दिन, रथसप्तमी या दिवशी धुळे एज्युकेशन सोसायटीच्या जो.रा. सिटी हायस्कूल व द.मा. बारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात 240 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 13 सूर्यनमस्कार घातले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अनार्सीग पावरा, उपमुख्याध्यापक विलास हलकरे, पर्यवेक्षक रविंद्र पाठक, विजय सरोदे, क्रीडा प्रमूख अमित गोराने, राजेंद्र बारे, भूपेंद्र मालपुरे उपस्थित होते. अमित गोराणे यांनी सूत्रसंचालन केले.

सूर्य नमस्काराचे महत्व भूपेंद्र मालपुरे यांनी विशद केले. कार्यक्रमाला मंगेश वळवी, माधवी तेले, सारिका देशमाने, संगिता मेहंदळे, राजू विधाते यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here