Twitter: @maharashtracity

मुंबई: जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होत शेकडो शिक्षकांनी मंगळवारी आंदोलन केले. चेंबूरमधील शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या मैदानात झालेल्या या आंदोलनात मुंबईतील विविध शाळांमधील शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. 

आंदोलनात शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या अधीक्षक नीता पाटील यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. या निवेदनाद्वारे २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व नंतर अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतरांना तसेच २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी दिली. 

सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर आहेत. देशातील पाच ते सहा राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. तर नवीन बंद केली आहे. तर जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी २००५ पूर्वी सेवेत रुजू झाले आहेत, ते अनुदानित असो किंवा मान्यताप्राप्त शाळातील असो , शिवाय ज्यांचे अनुदान २००५ नंतर आले आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव न करता जुनी पेन्शन योजना लागू करावी. हि पहिली मागणी असून दुसऱ्या मागणीत ज्यांची नियुक्ती २००५ नंतर झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी. या मागणीची प्रत केंद्राला देण्यात येणार असल्याचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी सांगितले. 

चेंबूरमधील शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या मैदानात झालेल्या या आंदोलनात मुंबईतील विविध शाळांमधील शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. जुन्या पेंशनसाठी राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला भाजपा शिक्षक आघाडीचे उत्तर विभागाचे अध्यक्ष दशरथ काशीद, प्रदेश सदस्य बयाजी घेरडे, सुभाष अंभोरे, विजय धनावडे, जुनी पेंशन समितीचे मदनलाल दुबे, संजय परदेशी, प्रतिभा तिवारी, संगीता पष्टे, सविता पाटील, अनिल जंगले, प्रभाकर पवार, ओ पी उपाध्याय, उमेश हसबे आदी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here