राज्यात १८८१ नवीन रुग्ण
मुंबई: राज्यात मंगळवारी १८८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. ही नोंद दोन हजाराच्या घरात जाणारी आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९६,११४ झाली आहे. आज ८७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३९,८१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ८४३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात मंगळवारी एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,११,१२,९५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,९६,११४ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत १२४२ बाधित
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १२४२ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०७०८५४ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९५६९ एवढी झाली आहे.