@maharashtracity
मुंबई: ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्य दूत पीटर ट्रसवेल यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात सदिच्छा भेट घेतली.
ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे पीटर ट्रसवेल यांची मुंबईच्या वाणिज्य दूतपदी प्रथमच नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांची आज सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत त्यांनी मुंबई महापालिकेने कोविड काळात केलेल्या कामांचे कौतुक केले. तसेच कोविड -१९ नियंत्रणाच्या उल्लेखनीय कामाबद्दल जागतिक स्तरावर मुंबई महापालिकेची घेण्यात आलेली दखल यासाठीसुद्धा त्यांनी महापालिकेची प्रशंसा केली.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी, वाणिज्य दूत पीटर ट्रसवेल यांचा महापालिकेने तयार केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कॉफीटेबल बुक, महापालिकेचे बोधचिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी ” एन ” विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती स्नेहल मोरे तसेच ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील उप वाणिज्य दूत मायकल ब्राउन उपस्थित होते.