@maharashtracity

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर मार्गावर पडल्याने राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे एक चाक मार्गावरून उतरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ही घटना आज सकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी ही ती राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) आहे.

या घटनेनंतर कोकण रेल्वेची (Konkan Railway) यंत्रणा घटनास्थळी तात्काळ रवाना झाली आहे. इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे.

यामुळे अपघातामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here