@maharashtracity
सात तलावांत ३१६ दिवसांचा पाणीसाठा
पुढील साडेदहा महिने पुरेल इतके पाणी
भातसा – ८२%, मध्य वैतरणा ९०% भरला
मुंबई: मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत (lakes) आतापर्यंत चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे या सातही तलावांत आजमितीस १२ लाख १८ हजार ८८० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा (water storage) जमा झाला आहे. मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे.
हा पाणीसाठा मुंबईला पुढील साडेदहा महिने म्हणजे ३१६ दिवस पुरेल इतका म्हणजेच पुढील ३० जून २०२१ पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे पुढील पावसाचा प्रारंभ होईपर्यंत मुंबईकरांना पाण्याचे अधिक टेन्शन घेण्याची गरज भासणार नाही.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव १६ ते २२ ऑगस्ट या एका आठवड्याच्या कालावधीत भरून वाहू लागले होते. यामध्ये, सर्वप्रथम १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, विहार तलाव (Vihar lake) १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४५ वाजता, मोडक सागर तलाव २२ ऑगस्ट रोजी माध्यरात्री ३.२४ वाजता तर तानसा तलाव सकाळी ५.४८ वाजता भरून वाहू लागला होता.
मात्र सर्वाधिक ७ लाख दशलक्ष लिटर इतकी क्षमता असलेला भातसा तलाव (Bhatsa lake) आज सकाळी ६ वाजेपर्यंत ८२.०८% , मध्य वैतरणा तलाव ८९.९८% तर अप्पर वैतरणा तलाव ७१.५०% भरलेले आहेत. अद्यापही पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत.
तलावांची स्थिती
तलाव पाणीसाठा टक्केवारी
अप्पर १,६२,३४९ ७१.५०%
वैतरणा
मोडक १,१३,५०६ ८८.०४%
सागर
तानसा १,४४,५९३ ९९.६६%
मध्य वैतरणा १,७४,१४७ ८९.९८%
भातसा ५,८८,५४१ ८२.०८%
विहार २७,६९८ १००%
तुळशी ८,०४६ १००%
--------------------------------------------------
एकूण १२,१८,८८० ८४.२१%