@maharashtracity

सोमवारी लसीकरण होणार

मुंबई: मुंबई महानगर पालिकेला (BMC) रविवारी ४४००० हजार लसींचा साठा मिळाला असल्याने सोमवारी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण (vaccination) सुरू राहणार आहे.

मुंबई पालिकेला मिळणाऱ्या अपुऱ्या लस तुटवड्यामुळे शनिवारी मुंबईतील राज्य सरकारी आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण कमी झाले. दर रविवारी लसीकरण बंद असते. सोमवारीही लसीकरणबाबत साशंकता होती. मात्र तूर्तास प्रश्न सुटला आहे.

दरम्यान, लसींचा साठा उपलब्ध झाल्याने सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती पालिका मुख्य आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली. लसींचासाठा जसा उपलब्ध होईल त्यानुसार लसीकरण सुरू राहील.

सीएसआर मधूनही पालिकेला लसी मिळणार आहेत. मुंबईकरांची अडचण होऊ नये यासाठी लसीकरणाची माहिती सातत्याने पुरवली जाते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण येईल. त्यामुळे, मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच पालिका लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये असे आवाहन गोमारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here