@maharashtracity

मुंबई: मुंबईत (Mumbai) कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव काहीसा कमी होत आहे. मात्र जो काही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो इमारतींमध्ये अधिक तर झोपडपट्टीत अगदी नगण्य प्रमाणात आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या फक्त ४ झोपडपट्टयात सक्रिय कंटेनमेंट आहे तर ३६ इमारती या सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईतील कोरोनासंदर्भातील अहवाल पाहता गेल्या २४ तासांत ३३१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाच्या ७ लाख ३७ हजार १९३ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४७३ एवढी आहे तर आतापर्यंत ७ लाख १४ हजार ६३९ रुग्ण (९७%) यशस्वी उपचारामुळे कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, सध्या विविध रुग्णालयात ४ हजार १९६ कोरोना बाधित सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे फक्त ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ९४२ एवढी झाली आहे. त्याचप्रमाणे,गेल्या २४ तासांत ३५ हजार २६४ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ८३ लाख ७९ हजार १४१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here