@maharashtracity

मुंबई: अन्न व औषध प्रशासन (FDA) बृहन्मुंबई कार्यालयास प्राप्त माहितीच्या आधारे या कार्यालयाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी महाकाली मसाला येथून ४४२ लिटरचा ३,३१,१९६ रुपये किमतीचा साठा भेसळ असल्याच्या संशयावरून जप्त केला.

पालघर येथील मे. कॅम्पबेल ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. यांनी उत्पादित केलेल्या ऑलिव्ह पोमॅस ऑइलचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचा आढळला. हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त व कमी दर्जा असल्याच्या (adulterated cooking oil) संशयावरून तेलाचे नमुने घेतले आहेत. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार (FSSAI) पुढील योग्य ती कार्यवाही घेण्यात येईल. ही कारवाई सह आयुक्त (अन्न) श.रा.केकरे सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ १चे रा.दि.पवार यांचे मार्गदर्शनाखाली म. मो. सानप अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here