@maharashtracity
महाड (रायगड): महाडमधील नांगल वाडी गावात लग्न ठरवायला आलेल्या कुटुंबातील एका अडीच वर्ष बालकाचा पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
महाड औद्योगिक पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांगलवाडी येथे सुधीर भगवान झुजम हे कुटुंबासहित मनोहर महाडिक यांच्या घरी लग्न ठरवण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. दुपारचे जेवण केल्यानंतर त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा श्रेयांश सुधीर झुजम हा कुठे दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी श्रेयांश हा घरामागील पाण्याच्या टाकीत पडलेला आढळून आला. त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
झुजम हे कुटुंब हेदली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथून आले होते. याप्रकरणी महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.