@maharashtracity

धुळे: राज्यात शेतकऱ्यांसह मराठा आरक्षण, ओ बी सी आरक्षणसह कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असतांना राज्य सरकार कोरोनाच्या आड लपून अधिवेशन केवळ 2 दिवसांचे करून पळ काढत आहे, तर दुसरीकडे राज्यातील 5 जिल्ह्यातील ओबीसीच्या रिक्त जागेवर निवडणुकीची घोषणा राज्याच्या निवडणूक आयोगाने करून नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.? या निवडणुकीमुळे जर कोरोनाचा प्रसार झाला आणि काही जीवितहानी झाली तर सरळ राज्य निवडणूक आयोगावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा माजी मंत्री, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयकुमार रावल यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या ५ जिल्ह्यातील सदस्यत्व रद्द झालेल्या ओबीसी जि प व प स सदस्यांची पोटनिवडणुक निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन २ दिवसांचे केले आहे, तसेच यंदाची पंढरपूरची वारीही रद्द केली आहे. या सर्वाना कोरोनाची अडचण असेल तर निवडणुक आयोग निवडणूक कसे काय घेत आहेत.? निवडणूक आली म्हणजे प्रचार, मेळावा व सभा हे सर्व येणारच, लोकांची गर्दी जमणारच.!

एकीकडे अधिवेशन गुंडाळलेले आहे, वारी रद्द करण्यात आली आहे आणि दुसरीकडे निवडणुका घेण्याचा घाट घालण्यात येत आहे. निवडणुकांमुळे कोरोना वढतोच हा अनुभव असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक का.?

या निवडणुकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याला सर्वस्वी राज्य निवडणूक आयोगच जबाबदार धरून यामुळे जनतेचे काही बरे वाईट झाल्यास राज्य निवडणूक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा माजी मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here