@maharashtracity

महाड: किल्ले रायगड परिसरातील गावात बिबट्याची असलेली दहशत आजही कायम आहे. काही दिवसापूर्वी चरावयास गेलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकवेळा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

किल्ले रायगडाच्या (Raigad fort) परिसरात असलेल्या पाचाड, रायगडवाडी, पुनाडे, सांदोशी, कोंझर आदी गावाच्या जवळ बिबट्याचे दर्शन होत आहे. शेतकऱ्याच्या समोरच पाळीव जनावरावर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ऐन पावसाळ्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या (attack by leopard) घटना पुन्हा वाढल्या आहेत.

यापूर्वी पाळीव जनावरांच्या (cattle) हल्ल्यात अनेक जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या होत्या. या बिबट्याला आळा घालण्यासाठी वन विभागाकडे स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली आहे. मात्र, यावर अद्याप उपाययोजना होत नसल्याने बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना (farmers) होतच आहे. पाचाड ते कोंझर या दरम्यान घाट मार्ग आहे. शिवाय घाटात जंगल भाग असल्याने बिबट्याचे या भागात वास्तव्य आहे. अशीच स्थिती किल्ले रायगड परिसरात असल्याने बिबट्या पाळीव जनावरांना आपले भक्ष्य करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here