आंदोलन छेडण्याची भाजप आमदार जयकुमार रावल यांचा इशारा

@maharashtracity

धुळे – गरज नसल्याचे कारण देत हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे तीन प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणारे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री जयकुमार रावल (BJP MLA Jaykumar Rawal) यांनी महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली आहे.

शासनाच्या नवीन धोरणानुसार धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री (Sakri)), शिंदखेडा (Shindkheda) आणि दोंडाईचा (Dondaicha) येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये (Rural Hospital) उभारले जाणारे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे तीन नवीन ऑक्सिजन प्रकल्प रद्द करण्यात आले.

गरज नसल्याने मंजूर असलेले हे प्रकल्प रद्द केल्याची धक्कादायक माहिती याबाबत समोर आली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन देणारे भाजपा आमदार जयकुमार रावल यांनी प्रशासनासह आघाडी सरकावर संताप व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत धुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढून ऑक्सिजनची गरज देखील वाढली हेाती. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालायत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला हेाता.

शिंदखेडा मतदारसंघात माजीमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात १ कोटी आणि शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात ८० लाख रुपये आमदार निधी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या प्रकल्पासाठी दिला होता.

परंतु शासनाने आमदार निधीसह जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर असलेले ऑक्सिजन प्लांट (Oxygen plant) रद्द करून मोठा झटका दिला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जिल्ह्यात मोठी हानी झाली होती. त्यात दोंडाईचा आणि शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय अंतर्गत येणार्‍या गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्णांची संख्या होती. त्यावेळी ऑक्सिजन कमी पडल्याने अनेक रुग्णाचे हाल झाले होते. म्हणून आ. रावल यांनी तातडीने निर्णय घेऊन दोंडाईचा आणि शिंदखेडा येथे नवीन ऑक्सिजन प्लांट उभा करण्यासाठी १ कोटी ८० लाखांचा निधी दिला होता. त्याची तांत्रिक मंजुरी ही झाली होती.

परंतु सरकारने एक पत्र पाठवून आमदार निधीतून होणार्‍या ऑक्सिजन प्लांटला मंजुरी नाकारली असून यामुळे शिंदखेडा मतदारसंघातील जनतेच्या मनात मोठा रोष निर्माण झाला आहे.

“कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात पुरविण्यात या सरकारला अपयश आले होते. राज्याचा आरोग्य विभाग कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी तयारी करावी, अशा सूचना एकीकडे देत असतांना तिसर्‍या लाटेत माझ्या मतदारसंघात नुकसान होऊ नये म्हणून मी गेली तीन महिने पाठपुरावा करून दोंडाईचा शहरासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तर शिंदखेडासाठी माझ्या स्वतः च्या आमदार निधीतून प्लांटसाठी निधी आणला. पण एक प्रकल्प तर निविदा स्तरावर असतांना रद्द करणे म्हणजे हा अन्याय असून यासाठी प्रसंगी आंदोलन करावे लागले तरी माझी तयारी आहे.”

  • आ.जयकुमार रावल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here