मदत व पुनर्वसन मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत ग्वाही!

By अनंत नलावडे

Twitter: maharashtracity

नागपूर: “लातूर व उस्मानाबाद येथे १९९३ साली झालेल्या भूकंपातील सर्व पात्र बाधितांचे पुनर्वसन झालेले असून काही पात्र बाधित यापासून वंचीत असतील तर तपासून घेऊन त्यांचेही पुनर्वसन केले जाईल”, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत एका लक्षेवधीला उत्तर देतांना दिली. यासंदर्भांत विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

सामंत म्हणाले की, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी भूकंपात बाधित झालेल्या गावांमध्ये गाळ साचलेला होता. यात ७० टक्के नुकसान झालेल्या गावांना स्वत:च स्वत:चे पुनर्वसन करावयाचे होते. तशा सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या होत्या. पुनर्वसनासाठी ४५ हजार कोटींचा प्रस्ताव आहे. तसेच ७२६ गावांच्या पुनर्वसनासाठी निधी दिला असून पुनर्वसन करुन घरे ताब्यात देण्यात आलेली आहेत. या गावांतील रस्ते इतर सोयी-सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here