@maharashtracity

मुंबई: कोविड-१९ (Covid-19) प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मर्यादीत प्रमाणात लससाठा उपलब्ध असल्यामुळे मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ३०९ पैकी ५८ निवडक महानगरपालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर (vaccination centres) मंगळवारी लसीकरण सुरु राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान ५८ लसीकरण केंद्रांची यादी मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आली आहे. लसीचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना लसीकरणाबाबत कळविण्यात येईल. त्याप्रमाणे मुंबईकर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here