@maharashtracity

मुंबई: मुंबईतील शासकीय व महापालिका लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा असल्याने ४ ऑगस्ट रोजी शासकीय व पालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण (vaccination) बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (BMC) घेतला आहे.

कोविड-१९ (Covid-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने १६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहीम राबवायला सुरुवात केली. मात्र केंद्र सरकार व लस उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून मुंबईतील शासकीय व पालिका लसीकरण केंद्रांवर आवश्यक लसीचा पुरवठा होत नसल्याने मुंबई महापालिकेला अधूनमधून लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे.

कोविड – १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर ४ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार आहे.

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असे मुंबई महापालिका प्रशासनाने कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here