के/पूर्व प्रभागापासून सुरुवात

@maharashtracity

मुंबई: जे नागरिक आजारपणासह शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोविड-१९ (covid-19) प्रतिबंधित लसीकरण (vaccination) करण्यास ३० जुलैपासून प्रायोगिक तत्वावर ‘के/पूर्व’ प्रभागापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात होणार आहे.

त्यासाठी, मुंबई महापालिका ‘प्रोजेक्ट मुंबई’ (Project Mumbai) या बिगर शासकीय सेवाभावी संस्थेचे सहकार्य घेणार आहे. वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणा सारखे उपक्रम महापालिकेने राबवले आहेत. मात्र आजारपणासह शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. त्यांची अडचण लक्षात घेता, अशा व्यक्तींना त्यांच्या घरी जावून कोविड लस देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. राज्य शासनाने, अंथरुणास खिळलेल्या व्यक्तिंचे लसीकरण करण्यासंदर्भात काही प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वं निश्चित केली आहेत.

या अनुषंगाने, ज्यांच्या घरात अंथरुणास खिळून असणारे व्यक्ती आहेत व ज्यांना अशा व्यक्तीचे कोविड लसीकरण करुन घ्यावयाचे आहे, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ई – मेल आयडीवर मागविण्यात आली आहे. आतापर्यंत ४ हजार ४६६ व्यक्तींची नावे प्राप्त झाली आहेत.

ज्यांचे लसीकरण करावयाचे आहे, अशी व्यक्ती पुढील किमान ६ महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रं देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्रं संबंधित व्यक्ती, नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करणे आवश्यक असेल. तसेच, अशा व्यक्तींना कोवॅक्सिन (Covaxin) ही लस देण्याचे निर्देश तज्ज्ञांच्या समितीने दिले असून त्यानुसार कोवॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here