@maharashtracity

धुळे: धुळे शहरातील श्री संस्कार मतिमंद बालगृहातील दिव्यांग बालिकांचे नुकतेच लसीकरण करण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी विशेष शिबीर बालगृहातच राबवले. कोरोना प्रतिबंधक लस मिळाल्याने बालगृहातील ३७ मुलींना कोरोना संसर्गाचा धोका कमी होणार आहे.

श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथील प्रवेशित बालिका ह्या दिव्यांग व बहुविकलांग असल्याने त्यांना बाहेरील केंद्रावर लसीकरणासाठी घेवुन जाणे शक्य नसल्याने त्यांना संस्थेतच लसीकरण करण्याची विनंती संस्था व्यवस्थापन समिती व समाज कल्याण विभाग, जि.प, धुळे यांनी महापालिका आयुक्त अजिज शेख यांना केली होती.

या विनंती नुसार दिनांक २३ जून रोजी म.न.पा लसीकरण पथकाने संस्थेत येवुन ३७ दिव्यांग मुली व कर्मचार्यांचे लसीकरण केले.

लसीकरणाची सुविधा संस्थेतच उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी संजय यादव, मनपा आयुक्त अजिज शेख, मनपा उपायुक्त गिरी यांनी विशेष सहकार्य केले. महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. पल्लवी रवंदळे यांनी लसीकरणावेळी संस्थेत येऊन उपस्थिती दिली.

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी बागुल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पी.यु. पाटील, बालकल्याण समिती सदस्य श्रीमती. वैशाली पाटील, प्रा. सुदाम राठोड, संस्थेचे सुनिल वाघ, भरत वाघ व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here