मुख्यमंत्री यांच्याशी महापौरांची चर्चा

महाराष्ट्र महापौर परिषदेची २२ वी ऑन लाईन सभा संपन्न

महापालिका सभा ऑफलाईन घेण्याबाबत एकमत

@maharashtracity

मुंबई: महाराष्ट्रातील विविध महापालिकांचे महापौर मुंबईत मुख्यमंत्री (CM), मंत्री (Minister) यांना भेटण्यासाठी अथवा महापौर परिषदेसाठी (Mayor Council) आल्यानंतर त्यांना त्यांचे नातेवाईक किंवा हॉटेल्समध्ये राहावे लागते. त्यामुळे अशा महापौरांची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी पुढाकार घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा केली आहे.     

महाराष्ट्र महापौर परिषदेची २२ वी सभा मुंबईत कोरोनाजन्य वातावरणात ऑनलाईन स्वरूपात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संपन्न झाली. यावेळी, बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली.   

अंधेरी (प.) येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयातून महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी या ऑनलाईन सभेचे आयोजन केले होते.      याप्रसंगी मार्गदर्शन करताना, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, गेल्या दीड वर्षात मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या याबाबतची सविस्तर माहिती उपस्थित महापौरांना दिली.  

महापालिका सभा ऑफलाईन घेण्याबाबत एकमत

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (Thane Mayor Naresh Mhaske) यांनी,  गेल्या दीड वर्षांच्या कोरोना काळात राज्यातील सर्व महापालिकांच्या सर्वसाधारण सभा या ऑनलाईन घेण्यात आल्याचे सांगितले.    मात्र आता या सभा ऑफलाईन होण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेत ठराव करून  प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. त्याला अनेक महापौरांनी अनुमोदन दिले.  कोरोना काळात विविध महापालिकांची कोलमडलेली आर्थिक स्थिती व ठप्प झालेली विकासाची कामे ठप्प मार्गी लावण्यासाठी या महापालिकांना एमएमआरडी आणि वित्तिय संस्थाकडून कर्ज उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाकडून मान्यता मिळण्याबाबत महाराष्ट्र महापौर परिषदेने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी महापौर नरेश मस्के यांनी केली.

या सभेत अनेक महापौरांनी आमच्या महापालिकांना लसीचा साठा कमी मिळतो. त्यामुळे लसीकरण सुरळीत होत नाही, अशा तक्रारींचा पाढा वाचत लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली.    

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महापौर परिषदेत, महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, मीरा-भाईदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, उल्हासनगरच्या महापौर लीला आशान, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, पिपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यत्रम, मालेगावच्या महापौर ताहेरा शेख, अकोलाच्या महापौर अर्चना मसने, अमरावतीचे महापौर चेतन गावडे, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी उपस्थिती दर्शवत चर्चेत भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here