@maharashtracity

धुळे: तालुक्यातील वाडीभोकर शिवारात तरुण दाम्पत्याने गळफास लावून घेत आत्महत्या (suicide) केली. दि. १२ रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पश्‍चिम देवपुर पोलिस ठाण्यात सखाराम आनंदा मोरे रा.नकाणे यांनी खबर नोंदवली.

नकाणे गावातील रहिवाशी विक्रम आनंदा मोरे हे दि. १२ रोजी दुपारी वाडीभोकर येथील शेतात काम करीत असतांना मोठा मुलगा रविंद्र विक्रम मोरे (वय २३) व त्याची पत्नी नयनाबाई रविंद्र मोरे (वय २१) हे दोघे जेवणाचा डबा घेवून आले. तसेच डबा देवून घरुन जेवण करुन येतो असे सांगून ते गेले. मात्र दुपारी ४ वाजले तरी ते परत न आल्याने त्यांना पाहण्यासाठी म्हणून विक्रम मोरे व लहान मुलगा सुरेश हे गेले. तेव्हा वाडीभोकर गावची पाणी पुरवठा विहीरीच्या बाजुला असलेल्या पंप हाऊस मध्ये रविंद्र मोरे आणि पत्नी नयनाबाई मोरे यांनी गळफास लावून घेतलेला असल्याचे आढळून आले.

विळ्याने गळफासचे दोर कापुन त्यांना खाली उतरवले. तसेच पोलिसांना कळवले. हिरे मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तरुण जोडप्याने एकत्र आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here