@maharashtracity

मुंबई: मुंबईत रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसात अंधेरी ( प.), एस. व्ही. रोड येथील फिरदौस मिठाईवाला यांच्या दुकानात मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉक लागून मोहम्मद सलीम पटेल (२६) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्याला घटनेनंतर तात्काळ नजीकच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते ; मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे ४.१५ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, असे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.

दरम्यान, ही दुर्घटना का व कशी घडली याबाबत स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे समजते.

मुंबईत शॉर्ट सर्किटच्या १३ घटना

मुंबईत (Mumbai) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होणे, शॉर्ट सर्किट (Short circuit) होणे आदी प्रकारच्या घटना घडतात. गेल्या २४ तासांत शहर भागात ६ ठिकाणी , पूर्व उपनगरात – ३ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – ४ ठिकाणी अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here