या स्फोटात कंपनीचे मालकही ठार झाले आहेत

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील m2 या प्लॉटमधील कारखान्यात संध्याकाळी ६.५० च्या सुमारास सुमारास भीषण स्फोट झाला असून या अपघातांमध्ये कंपनीच्या मालकासह आठ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.पूर्वी तारा नाईट्रेट या नावाने ओळखली जाणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कंपनीच्या आवारतील एक इमारत कोसळल्याची माहिती पुढे आली आहे तसेच या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

या कंपनीमध्ये हे अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात असल्याचे सांगण्यात येत असून या स्फोटाचा आवाज २५ ते ३० किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. डहाणू व पालघर पर्यंतच्या गावांमध्ये ते ऐकू आला. अनेक नागरिकांना पालघर भागात भूकंप झाल्याचा भास सुरुवातीला झाला. मात्र काही वेळाने हा स्फोटाचा आवाज असल्याचे स्पष्ट झाले.

या स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकली नाही. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून जखमी व मृत कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कंपनीच्या आवारामध्ये किमान आठ कामगार मृत्युमुखी पडल्याचे प्राथमिक रित्या सांगण्यात येत असून त्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कंपनीच्या आवारामध्ये काही रुग्णवाहिका आली असून याठिकाणी गोंधळाचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here