@maharashtracity
नागपूर: सध्याचा काळ हा एकमेकांच्या गुणदोषांवर चर्चेचा नाही. आपसातील भेदभावांना तिलांजली देऊन समाजहितासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक (Sarsanghchalak) डॉ. मोहन भागवत (Dr Mohan Bhagwat) यांनी केले. “पॉझिटीव्ह अनलिमिटेड” व्याख्यानमलेचे अंतिम व्याख्यान पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, कोरोना (corona) साथरोगाच्या या भयावह काळात आम्हाला आपसातील भेदांना दूर करून एकत्र यावे लागेल. आमच्यातील त्रूटी दूर कराव्या लागलीतल. हा काळ नैराश्यात बुडून जाण्याचा नसून धैर्य, जागरूकता, संक्रियता आणि विज्ञाननिष्ठ बनून पुढे जाण्याचा आहे.
‘यूनान, रोम, मिस्र मिट… हस्ती मिटती नहीं हमारी सदियो रहा है दुष्मन दौरे जहां हमारा’ या इक्बालच्या कवितेतील ओळींचा संदर्भ त्यांनी दिला. डॉ. भागवत म्हणाले की, कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर जनता, शासन, प्रशासन आत्ममग्न झाले होते. या दुर्लक्षातूनच साथरोगाची दुसरी लाट पसरली. आता वैज्ञानिक तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवताहेत. त्यासाठी आम्हाला आतापासूनच कंबर कसून सज्ज रहावे लागले असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना साथीत आपल्या आप्तेष्टांना गमावणाऱ्यांबद्दल संवेदना व्यक्त करताना डॉ. भागवत म्हणाले की, देशात पसरलेल्या प्लेगच्या साथीत आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार (Dr Hedgewar) यांच्या माता-पित्यांचे निधन झाले होते. परंतु, डॉ. हेडगेवार यांनी निराश न होता समाजाच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले. मृत्यू म्हणजे केवळ शरीर रूपी वस्त्र बदलण्याची प्रक्रिया असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.
तसेच वर्तमान स्थितीत धैर्य, जागरूकता, सक्रियता आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी उपचार, आहार-विहार यावर विशेष लक्ष देण्याची विनंती केली.
यासोबतच सरसंघचालकांनी समाजात पसरणाऱ्या अफवा, तर्कहिन वक्तव्य यापासून सावध राहण्याचे आवाहन केले. मास्कचा (mask) वापर, डॉक्टरांकडून मिळणारे वैद्यकीय सल्ले याचे काटेकोर पालन करण्यात यावे असे डॉ. भागवत म्हणाले. तसेच कुटुंबासोबत वेळ घालवून परस्परांशी संवाद साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“कुठलाही विजय अंतिम नसतो आणि पराभव म्हणजे अंत नाही, फक्त आम्ही प्रयत्नातील सातत्य कायम ठेवावे” असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.